Looking For Anything Specific?

नम्र आवाहन

नमस्कार, महापालिका निवडणूक नजरेच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. गेली अनेक वर्षे आपण राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात.  ही निवडणूक लढवून शहराच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आपल्या मनात आहे. त्या दृष्टीने आपण आपल्या पातळीवर प्रयत्नही सुरू केले असतील. पण, निवडणूक जिंकण्यासाठी केवळ आपल्या पातळीवर प्रयत्न करणे एव्हढेच पुरेसे नाही. त्यासाठी सुयोग्य रणनीती, प्रचार यंत्रणा उभारणी, कार्यकर्ता प्रशिक्षण, प्रचार व्यवस्थापन आणि प्रसारमाध्यमांद्वारे इमेज बिल्डिंग याची खास गरज असते. यासाठी आम्ही आपल्या मदतीला आलो आहोत. 1) मतदारसंघात सक्षम आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणून आपली प्रतिमा कशी विकसित करावी. 2) निवडणूक लढवण्याची तयारी करताना आवश्यक असलेले महत्वाचे मुद्दे कसे निवडावेत. 3) सातत्याने चर्चेत राहण्यासाठी काय करावे. 4) कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून संघटन कसे करावे. अशा महत्वाच्या मुद्द्यांवर आम्ही आपणास मदत करू शकतो. त्याचबरोबर  1) निवडणूक काळात आपली वेशभूषा, देहबोली कशी असावी. 2) भाषण करताना नेमके कोणते मुद्दे उचलावेत.  3) नागरिक, कार्यकर्त्यांशी संवाद कसा साधावा. 4) मतदारसंघात प्रसिद्धीसाठी कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे. यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही आपणाला मदत करू इच्छित आहोत. आपल्या विजयासाठी आवश्यक अशी सुयोग्य रणनीती आखण्यासाठी आपली भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. कळावे, धन्यवाद! आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
नम्र आवाहन नम्र आवाहन Reviewed by ANN news network on November 21, 2021 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.